22 Jul गरिबांनी झोपडीतच राहावे काय ? की फक्त पक्क्या घराचे स्वप्नच ?
Written By : साहेबराव हिवराळे, Aurangabad
‘प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी दीड वर्षापासून मिळालाच नाही’
औरंगाबाद : कोरोनाकाळात पंतप्रधान आवास योजनेच्या कामाला फक्त राज्य शासनाचा निधी प्राप्त झाला. दीड वर्षापासून केंद्राचा निधी न आल्याने ही योजना रखडली असून, गरिबांनी झोपडीतच राहावे काय? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. गोरगरिबांचे पक्क्या घराचे स्वप्न आता स्वप्नच ठरते आहे.
झोपडीऐवजी पक्की घरे बांधून गरिबांचीही घरे मजबूत करण्याच्या सरकारच्या आश्वासनाने कासवगती पकडली आहे. दीड वर्षापासून तिन्ही टप्प्यातील अनुदान लाभार्थ्यांना मिळालेले नाही. या योजनेत
प्रत्येक लाभार्थ्याला केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा मिळून अडीच लाखाचे अनुदान दिले जाते. शहरातील १०२० लोकांनी हे प्रस्ताव टाकले होते. त्यापैकी ७३१ मंजूर झाले. त्यातील २९२ लाभार्थ्यांना १ लाखाप्रमाणे २ कोटी ९२ लाख वाटप करण्यात आले. केंद्राचे दोन्ही हप्ते लाभार्थ्यांना मिळालेले नाहीत.
त्यात वाळू, खडी, सिमेंट, लोखंडाचे भाव वाढले असून, बांधकाम व्यावसायिकांनीदेखील पैशाअभावी कामे बंद केली आहेत. पक्की घरे बांधण्यासाठी आपली मातीची घरे पाडून लाभार्थी भाड्याच्या घरात राहायला गेले होते.आता अनुदानच रेंगाळल्यामुळे किती दिवस भाड्याच्या घरात राहणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेचा निधीचा तपशिल
- किती लोकांना मिळाला पहिला हप्ता -292
- किती लोकांना मिळणे बाकी -439
- मंजूर प्रस्ताव -739
- 292 जणांना मिळाले राज्य शासनाचे पहिल्या टप्प्याचे अनुदान.
- 439 जणांना थकले राज्य शासनाचे अनुदान.
- 731 जणांचे थकले केंद्राचे अनुदान.
- 0 जणांना मिळाले केंद्राचे दोन्ही टप्प्यांचे अनुदान.
प्रत्येक लाभार्थीला किती अनुदान मिळते?
- राज्य शासनाकडून- 10,0000
- केंद्र शासनाकडून- 1,50,000
वाळू मिळेना, साहित्यही महागले
पंतप्रधान आवास योजनेत वाळू मिळत नाही. वाळू, खडी, सिमेंट, लोखंडासह मजुरीदेखील वाढली आहे. त्यामुळे घर बांधतांना लाभार्थ्यांच्या अडचणी आहे.
Ref.by & Credits Hello Aurangabad Page No.3 Jul 21, 2021 Lokmat
No Comments